नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले पाहिजेत इम्रान खान यांचं वक्तव्य

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले पाहिजेत इम्रान खान यांचं वक्तव्य

इस्लामाबाद - काही ठराविक प्रसारमाध्यमांशी इम्रान खान यांनी यंवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सगळ्यांच्या भूवया उंचावल्या. तसेच यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास राजकीय पक्षांकडून टीका होईल या भीतीने शांततेची चर्चा होणार नाही असेही म्हटले आहे. निवडणुकीआधीचे आणि एक निवडणुकीनंतरचे असे दोन मोदी आपल्याला बघायला मिळतील असेही इम्रान खान म्हणाले. 

दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचा खात्मा केला. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोपही भारताने केला. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाकिस्तानची कोंडी झाली होती. दरम्यान, पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करत भारताचे लढाऊ विमान पाडले. यावेळी भारतीय वैमानिक अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेऊन नंतर सुटका केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विरोधकांकडून आपण घेरले जाऊ या भीतीने आमच्यासोबत चर्चा करण्यास घाबरेल असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर त्यांना उत्तर देणे गरजेचे होते. जर आम्ही उत्तर दिले नसते तर आमच्यावर प्रचंड टीका झाली असती. जर तुम्ही उत्तर दिले नाही तर कोणतंही सरकार पाकिस्तानात टिकू शकत नाही असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. 

Web Title: Imran Khan Sees Better Chance Of Peace Talks If PM Modi Wins Elections

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com