कमांडर अभिनंदन वर्धमान ह्यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालय भारतासोबत चर्चा करण्यास तयार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या लढाऊ विमानांकडून करण्यात आलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळले होते. यादरम्यान भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. त्यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतासोबत चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, असे सांगितले. 

भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई दलाने काल (बुधवार) चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यादरम्यान पळून जाणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-21 लढाऊ विमान कोसळले. हे विमान कोसळण्यापूर्वी वर्धमान पॅराशूटच्या साहाय्याने बाहेर पडले होते. त्यावेळी जखमी अवस्थेतील वर्धमान यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले. त्यांच्या सुटकेसाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिनिव्हा करारामधील तरतुदींनुसार अभिनंदन यांची सुटका केली जावी, अशी मागणी केली जात आहे.  

दरम्यान, पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत भारताशी चर्चा करण्यास पाकिस्तान तयार आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी सांगितले.

Web Title: Pak says we are ready for discussion about wing commander Abhinandan

संबंधित बातम्या

Saam TV Live