मसूद अझहरची मालमत्ता जप्त करण्याचे पाकचे आदेश 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 मे 2019

इस्लामाबाद : 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अजहरला संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले त्यानंतर त्याच्या भोवतालची संकटे वाढली आहेत. पाकिस्तान सरकारनेच यासाठीचं पहिलं पाऊल उचललं असून मसूदची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर त्याच्या प्रवासावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. 

संयुक्त राष्ट्रसंघानं मसूदविरोधात काढलेल्या बंदी आदेशाचं पूर्ण पालन करण्याचा आमचा प्रयत्न असून मसूदवर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी अधिसूचना पाकिस्तानातील इम्रान खान सरकारनं काढली आहे. 

Web Title : Pakistan's order to seize assets of Masood Azhar

संबंधित बातम्या

Saam TV Live