दहशतवादी संघटनेला पाकिस्तनाच्या जमिनीची वापर करू देणार नाही- इम्रान खान

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 9 मार्च 2019

इस्लामाबाद : पुलवामा येथे भारतीय लष्करावरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकार दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे आरोप जगभरातून झाले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र जाहीर करावे यासाठीही मागणी झाली व दबाव टाकला गेला. यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपले सरकार देशाबाहेरील दहशतवादी हल्ले करणाऱ्या कोणत्याही दहशतवादी संघटनेला पाकिस्तनाच्या जमिनीची वापर करू देणार नाही, असे म्हटले आहे. 

मागच्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या इम्रान खान यांनी या पूर्वीच्या सरकारवर टीका करत ते सरकार दहशतवादी संघटनांना पोसत होते, असा आरोप केला आहे. इतके वर्ष सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांवर या पूर्वीच्या सरकारने कोणत्याच प्रकारचे कठोर पाऊल उचलले नाही.

आमचे सरकार आल्यापासून राष्ट्रीय व सुरक्षासंबंधीच्या योजना तयार करत असून आम्ही त्याकडे गांभीर्याने लक्ष देत आहोत, असेही खान यांनी सांगितले. पाकिस्तान सरकारने 182 मदरसे आपल्या ताब्यात घेतले आहेत. तसेच पाकने बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित 100 दहशतवाद्यांना सरकारने ताब्यात घेतले आहे. आम्ही दहशतवादाला आळा बसेल अशा उपाययोजना करीत असल्याचे खान यांनी सिंध प्रांतात एका जाहीर सभेत बोलताना सांगितले.  

Web Title: We Will Not Allow Terrorist To Use Pakistani land Says Prime Minister Imran Khan

संबंधित बातम्या

Saam TV Live