विंग कमांडर अभिनंदन यांची उद्या पाकिस्तानमधून होणार सुटका

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

इस्लामाबाद : भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानाला पिटाळून लावण्यासाठी त्यांचा हवेतच पाठलाग करणारे एक मिग विमान पाकच्या हद्दीत कोसळले. यादरम्यान, भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या ताब्यात होते. आता त्यांची सुटका उद्या (शुक्रवार) केली जाणार असल्याची माहिती पाकिस्तानी संसदेने दिली. 

पाकिस्तानी सैनिकांनी वर्धमान यांना पकडून जबर मारहाण केली. त्यांची रक्तबंबाळ अवस्थेतील अभिनंदन यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने खळबळ निर्माण झाली होती. अभिनंदन यांना परत आणा, अशी मागणी देशभरातून करण्यात येत होती. त्यानंतर आता त्यांना भारतात परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  

Web Title:Pakistan PM says they will release Indian pilot Abhinandan tomorrow in Joint session of parliament

संबंधित बातम्या

Saam TV Live