भारताची चंद्रावरील दुसरी झेप यशस्वी; चंद्रयान-2 चं यशस्वी प्रक्षेपण 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 जुलै 2019

श्रीहरिकोटा : मागील आठवड्यात स्थगित करण्यात आलेल्या 'चांद्रयान- 2' आज (सोमवारी) दुपारी दोन वाजून 43 मिनिटांनी अवकाशात यशस्वीरित्या झेपावले. चंद्राच्या अप्रकाशित भागावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने भारताचे चांद्रयान-2 काम करणार आहे.

श्रीहरिकोटा : मागील आठवड्यात स्थगित करण्यात आलेल्या 'चांद्रयान- 2' आज (सोमवारी) दुपारी दोन वाजून 43 मिनिटांनी अवकाशात यशस्वीरित्या झेपावले. चंद्राच्या अप्रकाशित भागावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने भारताचे चांद्रयान-2 काम करणार आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के. सिवन यांनी या मोहिमेबाबत नुकतीच माहिती दिली होती. तांत्रिक दोष आढळून आल्यानंतर आम्ही 'चांद्रयान- 2' मोहिमेची उलटगणती थांबविली होती. यानातील तांत्रिक दोष शोधून ते दूर करण्यात आले. त्यानंतर आम्ही पुन्हा अनेकदा चाचण्या घेतल्या, त्यामुळे आता पुन्हा कुठलाही दोष निर्माण होण्याची शक्‍यता नाही, असे त्यांनी म्हटले होते. अखेर इस्त्रोची ही मोहिम यशस्वी ठरली आहे.

 

 

तब्बल 45 दिवस प्रवास केल्यानंतर 'जीएसएलव्ही मार्क- 3' हा प्रक्षेपक 'चांद्रयान- 2'ला चंद्राच्या कक्षेत पोचविणार आहे. अखेरच्या 15 मिनिटांमध्ये 'चांद्रयान- 2' हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर घिरट्या घालणार आहे. 

या मोहिमेद्वारे चंद्राच्या आतापर्यंत संशोधन न झालेल्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवून अभ्यास केला जाणार आहे. यानातील 'विक्रम' लँडर 54 दिवसांनी चंद्रावर उतरणार आहे. यानातून 'प्रग्यान' ही बग्गी बाहेर येऊन चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणार आहे. "इस्रो'ची ही आतापर्यंतची सर्वांत महत्त्वाची मोहीम मानली जात आहे. चंद्राला 'स्पर्श' करणारा भारत चौथा देश ठरला आहे. आतापर्यंत ही कामगिरी अमेरिका, रशिया आणि चीनने साध्य केली आहे. 

WebTitle :marathi news ISRO GSLVMkIII-M1 lifts-off from Sriharikota carrying Chandrayaan2

 


संबंधित बातम्या

Saam TV Live