इटलीत कोरोनाचा कहर, कोरोनामुळे 9 हजाराहून अधिक जणांचा मृत्यू

साम टीव्ही
शनिवार, 28 मार्च 2020

इटलीत कोरोनामुळे मोठं संकट

आतापर्यंत चीनपेक्षाही जास्त मृत्यू

चिंताजनक परिस्थितीला इटली कशी सामोरे जाणार?

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या करोना विषाणूने संपूर्ण जगात भयंकर रुप घेतलंय. जीवावर बेतणाऱ्या हा करोना विषाणू सुमारे 198 देशांमध्ये फैलला आहे. करोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जवळपास 50 हून अधिक देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आलंय. वेळीच कोरोनाला नाही रोखलं तर परिस्थिती हाताबाहेर जायची शक्यता आहे. मात्र इटलीत कोरोनानं तीच भयंकर परिस्थिती धारण केलीय. 

#21daylockdown | पांडुरंगा महाराष्ट्राला लढण्याचं बळ दे! आपण लढू आपण जिंकू

इटलीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 9 हजारांच्याही पुढे गेलाय. याठिकाणी आतापर्यंत 9 हजार 134 जणांचा मृत्यू झाला असून एकाच दिवसात 919 जणांचा बळी गेलाय. आतापर्यंत एखाद्या देशांत एकाच दिवशी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची  ही सर्वाधिक  संख्या आहे.  इटलीत कोरोनामुळे आणीबाणीची परिस्थीती आहे. या विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून संपूर्ण इटली 'लॉकडाऊन' म्हणजेच बंद आहे. लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकमेकांपासून तीन फुटांचं अंतर ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. तर लाखो लोकं आपल्या घरातच थांबलेली आहेत. दरम्यान मृतांच्या आकडेवारीच्या बाबतीत इटलीने चीनलाही मागे टाकलंय. 

#coronavirusindia | कोरोनाशी लढण्यासाठी 15 हजार कोटी रुपयांच्या निधीची मोदींकडून घोषणा

त्यामुळे आता इटलीची परिस्थिती सुधारण्यासाठी किती वेळ लागते हे सांगणं अशक्य आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live