Loksabha 2019 : अरुणाचल प्रदेशमध्ये 2 मंत्री आणि 12 आमदारांनी सोडली भाजपची साथ

Loksabha 2019 : अरुणाचल प्रदेशमध्ये 2 मंत्री आणि 12 आमदारांनी सोडली भाजपची साथ

इटानगर - लोकसभा निवडणूक 2019ची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. परंतु, निवडणूकीपूर्वी भाजपाला धक्का बसला आहे. अरुणाचल प्रदेशमधील भाजपाचे 2 मंत्री आणि 12 आमदार मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टी(एनपीपी) मध्ये सहभागी झाले आहेत. भाजपाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी पक्षाला रामराम केला आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वीच गृहमंत्री कुमार वाई, पर्यटन मंत्री जारकार गामलीन आणि इतर विद्यमान आमदारांना भाजपाने तिकीट देण्यास नकार दिला होता. या पार्श्वभूमिवर या सर्वांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे.

दरम्यान, भाजपाने निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकांना उमेदवारी नाकारली. आता आम्ही जिंकण्यासाठीच निवडणूक लढवू, असा इशाराही या नेत्यांनी भाजपाला दिला आहे.

भाजपानं खोटी आश्वासनं देऊन लोकांच्या मनातील पहिल्यापासून असलेला विश्वास गमावला आहे. आम्ही फक्त निवडणूक लढणार नाही, तर अरुणाचल प्रदेशमध्ये एनपीपीचं सरकार बनवू. तसेच पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल(पीपीए)चा एक आमदार आणि भगवा पार्टीचे 19 नेते एनपीपीमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये एनपीपीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे गृहमंत्री कुमार वाई यांनी म्हटले आहे.  

Web Title: Two Ministers And twelve Mlas Left Bjp Joined Npp In Arunachal pradesh

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com