VIDEO | प्रेमासाठी वाट्टेल ते! वाघीणीच्या शोधात वाघाची हजारो किमीची भटकंती

साम टिव्ही
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020
 • वाघिणाच्या शोधात वाघाची हजारो किमीची भटकंती
 • वॉकर नावाच्या वाघिणीसाठी वाघ वणवण फिरला 
 • शरीरावर लावलेल्या रेडिओ कॉलरमुळे मिळाली माहिती 

प्रेमासाठी वाट्टेल ते. तोही तिच्यासाठी हजारो किलोमीटरची भटकंती करत राहिला. तेही रात्रीची. तो कुठे जात होता. ? काय करत होता. ? कुणाला भेटत होता. ? हे सगळं कळत होतं. नक्की हा प्रेम वेडा आहे तरी कोण? ते तुम्हीच पाहा.

.वॉकर वाघ. वाघिणीच्या शोधात वॉकर वाघानं अख्खं अभयारण्य पिंजून काढलं पण वाघिण काही सापडली नाही. तिच्याच शोधात वॉकरनं एक दोन नव्हे तर तब्बल सात जिल्हे पालथे घातले. आणि तब्बल 3 हजार किलोमीटरची पायपीट केली. देशातला सर्वाधिक पायपीट करणारा हा वॉकर वाघ. कधी तेलंगणात. तर कधी महाराष्ट्रातल्या अभयारण्यात येऊन वॉकर विसावला. वाट्टेल तसं. वाट्टेल तेव्हा वॉकर फक्त वाघिणीच्या शोधात फिरत राहिला. वॉकर कुठे जात होता. ? कुठे थांबला. ? त्याने काय केलं. ? त्याच्या शरीरावर लावलेल्या रेडिओ कॉलरमुळे हे सगळं काही कळत होतं...

 • वाघिणाच्या शोधात वाघाची भटकंती
 • वाघ कुठे कुठे फिरत होता. त्याच्यावर कशी पाळत ठेवली होती. पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 
 • वाघिणीसाठी वाघाची पायपीट
 • गेल्या वर्षी फेब्रुवारीत वॉकरला रेडिओ कॉलर बसवण्यात आली होती
 • जीपीएस सॅटेलाईट यंत्रणेद्वारे वाघावर पाळत ठेवण्यात आली
 • तो कुठे कुठे आणि किती वाजता गेला आहे याची नोंद ठेवण्यात आली
 • वॉकर 5 हजार ठिकाणी हिंडला असल्याचं स्पष्ट झालं
 • गेल्यावर्षी हिवाळ्याचा हंगाम आणि उन्हाळ्यात वॉकर नद्या, कालवे, हायवे असा मनसोक्त भटकला. वॉकरने जास्तीचा प्रवास हा रात्रीचा केला. जंगली डुकरं आणि मांजरांना तो फस्त करत राहिला. जंगलात राजासारखं फिरला. हे सगळं तो फक्त तिच्या शोधात करत होता. संजय तुमराम साम टीव्ही चंद्रपूर


संबंधित बातम्या

Saam TV Live