जैन मुनी तरुण सागर यांचे दीर्घ आजाराने दिल्लीत निधन

 जैन मुनी तरुण सागर यांचे दीर्घ आजाराने दिल्लीत निधन

नवी दिल्ली: जैन मुनी तरुण सागर यांचे दीर्घ आजाराने दिल्लीत निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ते 51 वर्षांचे होते. पूर्व दिल्लीतील कृष्णा नगर येथील राधापुरी जैन मंदिरात तरुण सागर यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे 3 वाजता त्यांचे निधन झाले. अतिशय कडव्या विचारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तरुण सागर यांच्या अनुयायांची संख्या खूप मोठी आहे. तरुण सागर यांच्यावर आज दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार केले जातील.

दरम्यान, गेल्या 20 दिवसांपूर्वी त्यांना काविळ झाली होती. त्यामुळे त्यांना मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रकृतीत सुधारणाच होत नसल्यामुळे तरुण सागर यांनी उपचार थांबवून चातुर्मास स्थळी जाऊन संथारा घेण्याचा निर्णय घेतला होता. संथारा म्हणजे जैन धर्मानुसार मृत्यू समीप पाहून अन्न-पाण्याचा त्याग करणे होय. अतिशय कडव्या विचारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तरुण सागर यांच्या अनुयायांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे तरुण सागर यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजताच त्यांच्या लाखो अनुयायांकडून प्रार्थना केल्या जात होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अनेक कुप्रथांवर परखड शब्दांमध्ये प्रहार करणारे मुनी अशी तरुण सागर यांची ओळख होती.

तरुण सागर यांचे नाव पवन कुमार जैन असे होते. त्यांचा जन्म 26 जून 1967 रोजी मध्य प्रदेशातील दमोह इथल्या गुहजी गावात झाला. तरुण सागर यांनी 1981 मध्ये गृहत्याग केला. त्यानंतर त्यांनी छत्तीसगडमध्ये दीक्षा घेतली. तरुण सागर यांनी मध्य प्रदेश आणि हरियाणा विधानसभेतही प्रवचन दिलं होतं. हरियाणा विधानसभेतील प्रवचनावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. मध्य प्रदेश सरकारने 6 फेब्रुवारी 2002 रोजी त्यांना राजकीय अतिथीचा दर्जाही दिला होता.

Web Title: Marathi News Jain Muni Tarun Sagar dies passes away in delhi

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com