भारताचे MIG-21 राजस्थानात कोसळलं

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 मार्च 2019

जयपूर- भारताचे मिग-21 हे लढाऊ विमान आज (ता.08) राजस्थानातील बिकानेर येथे कोसळले आहे. वैमानिकाने सुखरूप असून त्याने ही दुर्घटना घडण्यापूर्वीच विमान सोडले होते. आज दुपारी ही घटना घडली.

मिग-21 या भारताच्या लढाऊ विमानाने नियमीत तपासणीसाठी आज दुपारी उडाण केले होते. परंतु, काही तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळले असल्याची माहिती संरक्षण खात्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

यापूर्वीही जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे अशा प्रकारची दुर्घटना घडून दोन वैमानिक हुतात्मा झाले होते. दरम्यान, पुलवामा हल्ल्याच्या घटनेनंतर भारताचे विमान कोसळण्याची ही दुसरी वेळ आहे.

Web Title: Air Forces MiG Aircraft Crashes In Rajasthan's Bikaner Pilot Ejects

संबंधित बातम्या

Saam TV Live