जैश आणखी एका हल्ल्याच्या तयारीत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

पुलवामा हल्ल्याचा तपास करणाऱ्या तपासयंत्रणेच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. यानुसार, गुजरात राज्यात दहशतवादी घुसले असल्याची माहिती समोर आली आहे.

पुलवामा हल्ल्याचा तपास करणाऱ्या तपासयंत्रणेच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. यानुसार, गुजरात राज्यात दहशतवादी घुसले असल्याची माहिती समोर आली आहे.

  • जैश आणखी एका हल्ल्याच्या तयारीत.
  • देशाच्या अनेक भागात हाय अलर्ट.
  • पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर प्रमाणेच गुजरात मध्येही हल्ल्याचा कट असल्याची माहिती समोर.
  • गुजरात मध्ये सार्वजनिक ठिकाणची सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे. गुजरात मध्येही हाय अलर्ट.
  • अतिरेक्यांचे संभाषण भारतीय सुरक्षा दलाच्या हाती.
  • दहशतवाद्यांची टोळी भारतात शिरली असून त्यात एक महिलेचाही सहभाग आहे.
  • जैश-ए-महंम्मद संघटनेने भारतात दहशतवादी घुसवल्याचे उघड झाले आहे.

याशिवाय काही महत्त्वाचे मुद्दे...

- दहशतवाद्यांना रसद पोहोचविणाऱ्या आणि आयएसआयशी संपर्कात असणाऱ्या 18 हुर्रियत नेत्यांची जम्मू काश्मीर सरकारने सुरक्षा हटवली आहे. फुटीरतावादी नेत्यांसह 155 राजकीय नेत्यांची सुरक्षा काढण्याचा निर्णय जम्मू काश्मीर सरकारने काल रात्री घेतला. यापूर्वी केंद्र सरकारने हुर्रियत परिषदेच्या 6 नेत्यांची सुरक्षा काढली होती. 
- दहशतवाद्यांना पोसू नका व मदतही देऊ नका. संयुक्त राष्ट्र संघातील आपल्या जबाबदाऱ्या पार पाडा, असा सल्ला वजा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि पाकिस्तानला दिला आहे.  

 

Web Title: There is a women terrorist in terrorist gang who have entered India


संबंधित बातम्या

Saam TV Live