मी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते, तेव्हा सगळ्यांचीच झोप उडाली होती - खडसे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 मार्च 2019

जळगाव : माणसाने स्वप्न पाहणे आवश्यक आहे, मात्र स्वप्न असे पहा कि चांगल्या चांगल्याची झोप उडाली पाहिजे. जसे की मी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते, तेव्हा सगळ्यांचीच झोप उडाली होती असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केले आहे.

भुसावळ येथे नाहाटा महाविद्यालयात गुरुनाथ फाऊंडेशन आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. खडसे यांनी यापूर्वीही मी मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहिल्याने मला बाजूला करण्यात आल्याचे म्हटले होते. त्यांनी सतत भाजपला लक्ष्य केले आहे.

खडसे यांच्यावर जमीन गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. खडसे यांना क्लिनचिट मिळूनही अद्याप त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांनी सतत पक्ष नेतृत्वाबद्दल नाराजी दर्शविलेली आहे. मध्यंतरी खडसे दुसऱ्या पक्षात जाणार अशी चर्चाही होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने खडसे यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वाचे समजले जात आहे.

Web Title: BJP leader Eknath Khadse talked about BJP leadership

संबंधित बातम्या

Saam TV Live