जळगाव जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट

जळगाव जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट

जळगाव - जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून, वाघूर धरणातही जलसाठा कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे पत्र दिले आहे. त्यात चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. महापालिका प्रशासनाकडून फेब्रुवारीपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली.

वाघूर धरणात सध्या ३२ टक्के पाणीसाठा आहे. हा साठा १५ जुलैपर्यंत पुरेल एवढाच शिल्लक आहे. त्यात महापालिकेला आरक्षित पाणी उपसा ४० दशलक्ष घनमीटर आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टंचाई विभागाकडून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी महापालिका प्रशासनाने शहरासाठी चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. 

फेब्रुवारीत तीन दिवसांआड पाणी 
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने पाण्याचे नियोजन करण्यास सुरवात केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जरी चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या असल्या तरी गळती रोखून, तसेच इतर उपाययोजनांनी पाणी बचत करून जळगावकरांना फेब्रुवारी महिन्यापासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे.

सुप्रिम कॉलनीसाठी एमआयडीसीकडे पत्रव्यवहार सुरू 
अनेक वर्षांपासून सुप्रिम कॉलनीत पाण्याची समस्या आहे. या सुप्रिम कॉलनी परिसराला एमआयडीसीकडून पाणी घेण्यासाठी पत्र दिले आहे. मागे देखील एमआयडीसीकडून पाणी घेतले होते. मात्र, त्याचे पैसे दिले नसल्याने पाणी देणे बंद केले होते. त्यानुसार पुन्हा या पाण्यासाठी महापालिकेने पत्रव्यवहार सुरू केला आहे. 

Web Title: Drought conditions in Jalgaon district

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com