एकनाथ खडसे 'या' पक्षात जाणार? लवकरच करणार घोषणा

Eknath Khadse
Eknath Khadse

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे निश्‍चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दोन दिवस ते राज्याबाहेर असून ते राज्यात परत आल्यानंतर याबाबत चर्चा करून 20 डिसेंबरपर्यंत त्यांचा प्रवेश सोहळा होईल असे त्यांच्या निकटवर्तीयाकडून सांगण्यात येत आहे. 

खडसे यांनी परळी येथील गोपीनाथ गडावर नुकत्याच झालेल्या मेळाव्यात माझा भरवसा धरू नका, मी केंव्हाही पक्षांतर करू शकतो असा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांच्या पक्षांतरांची जोरदार चर्चा सुरू झाली होती.

त्या अगोदर खडसे दिल्ली येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार भेटून आले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईतही शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे शिवसेनेत जाणार की राष्ट्रवादीत जाणार यावर चर्चा सुरू झाली होती. 

त्यातच कॉंग्रेसचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी खडसे कॉंग्रेसमध्ये आल्यास त्यांचे स्वागत आहे. असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे खडसेंच्या प्रवेशाबाबत अधिकच गुढ वाढले होते. मात्र अखेर खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना भेटण्यास गेले असता, त्यांना छगन भुजबळांचे उदाहरण देण्यात आले. 

भुजबळ अचणीत असतांना पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. तसेच त्यांना आता मंत्रिमंडळातही घेण्यात आले आहे.खडसे यांनाही त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने खंबीरपणे उभे राहण्याची हमी दिली आहे.

या शिवाय मुक्ताईनगर मतदार संघातील रचनेचा विचार करून त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचे निश्‍चित केले असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. खडसे दोन दिवस राज्याबाहेर जाणार आहेत. तेथून परतल्यावर ते पुढील चर्चा करणार आहेत. 

त्यानंतर 20 डिसेंबरला प्रवेश प्रक्रिया निश्‍चित होण्याची शक्‍यताही खात्रीलायक सुत्रांनी सांगितली. विशेष म्हणजे खडसे यांचा प्रवेशामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला खानदेशात तर फायदा होणारच आहे. परंतु थेट विदर्भातील मलकापूर,बुलढाणा व अकोला जिल्हयापर्यंत फायदा होणार आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीतर्फे त्यांना मंत्रीपद देण्याचेही निश्‍चित असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु पदाचा विचार न करता केवळ पक्ष कार्य म्हणून खडसे यांनी "राष्ट्रवादी"त प्रवेश करण्याचा निर्णय निश्‍चित केल्याचे सांगण्यात येत आहे.  

Web Title : Eknath Khadse May Be Join NCP 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com