कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा योग

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

जळगाव : ग्रहांच्या सावलीच्या खेळातून कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा योग गुरुवारी (ता.26) अनुभवयास मिळणार आहे. भारतातील कर्नाटक, केरळ व तमिळनाडूत हे सूर्यग्रहण "कंकणाकृती' स्वरूपात दिसणार असले तरी उर्वरित भारतात ते खंडग्रास स्वरूपात दिसेल. जळगाव जिल्ह्यातही हे सूर्यग्रहण खंडग्रास स्वरूपात साधारण 68 टक्के दिसणार आहे. 

जळगाव : ग्रहांच्या सावलीच्या खेळातून कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याचा योग गुरुवारी (ता.26) अनुभवयास मिळणार आहे. भारतातील कर्नाटक, केरळ व तमिळनाडूत हे सूर्यग्रहण "कंकणाकृती' स्वरूपात दिसणार असले तरी उर्वरित भारतात ते खंडग्रास स्वरूपात दिसेल. जळगाव जिल्ह्यातही हे सूर्यग्रहण खंडग्रास स्वरूपात साधारण 68 टक्के दिसणार आहे. 
आकाशात घडणाऱ्या नैसर्गिक चमत्कारांपैकी एक म्हणजे सूर्यग्रहण. त्यातही जर ते दुर्मिळ कंकणाकृती सूर्यग्रहण असेल तर "सोने पे सुहागा'. आणि हाच योग येत्या 26 डिसेंबरला बघण्याची संधी मिळणार आहे. या ग्रहणाचा मुख्य मार्ग म्हणजे चंद्राच्या गडद सावलीचा मार्ग दक्षिण भारतातून कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यातील काही शहरांमधून जाणार आहे. त्यामुळे त्यांना पूर्ण कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळेल. 

कसे होते सूर्यग्रहण? 
पृथ्वी सूर्याभोवती ज्या प्रतलात फिरते, त्या आयनिक प्रतलातून पृथ्वीभोवती फिरत नाही. चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी 5 अंशाचा कोन करतो. या दोघेही कक्षा ज्या दोन ठिकाणी एकमेकांना छेदतात त्या दोन बिंदूंना राहू व केतू म्हणतात. हे बिंदूंच्या ठिकाणी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात. ज्यामुळे सूर्य आणि पृथ्वी यांच्यात चंद्र आला तर सूर्यग्रहण होते. 

सूर्यग्रहण कंकणाकृती 
चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा थोडी अंडाकृती आहे. त्यामुळे कधी तो पृथ्वीच्या जवळ असतो तर कधी दूर असतो. यामुळे चंद्र आपल्याला आकाराने कधी थोडा मोठा तर कधी छोटा दिसतो. ज्यावेळी तो पृथ्वीपासून सर्वांत दूर असतो त्यावेळी पृथ्वीवरून त्याचा आकार थोडा छोटा दिसतो. अशा वेळी सूर्यग्रहण झाले तर तो सूर्याला पूर्णपणे न झाकता फक्त मधला भागच झाकू शकतो. त्यामुळे पृथ्वीवरून दिसताना सूर्याचा बाहेरचा भाग कड्यासारखा प्रकाशित झालेला दिसतो आणि आकाशात अद्‌भूत असे एक प्रकाशित कडे दिसते.. म्हणून त्याला "कंकणाकृती' सूर्यग्रहण म्हणतात. 

जळगावात असे असेल ग्रहण 
जळगावला ग्रहणाला गुरुवारी सकाळी 8 वाजून 7 मिनिटांनी सुरवात होईल. 9 वाजून 25 मिनिटांनी चंद्राने सूर्याला 68.2 टक्के झाकलेले असेल. त्यानंतर ग्रहण सुटायला सुरवात होईल.. आणि 11 वाजता ग्रहण संपेल. खंडग्रास सूर्यग्रहणाचा पूर्ण काळ 2 तास 52 मिनिटांचा असेल. 

"मू. जे.'त उपक्रम 
महाविद्यालयाच्या भूगोल विभाग आणि जळगाव खगोल ग्रुप यांच्यातर्फे 26 डिसेंबरला सकाळी 7 वाजून 30 मिनिटांपासून भूगोल विभागाच्या गच्चीवर 12 इंचाच्या टेलिस्कोपमधून सोलर फिल्टरद्वारे सूर्यग्रहण पाहता येणार आहे. ग्रहणाबद्दल कोणतेही गैरसमज न ठेवता या दुर्मिळ खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा, असे आवाहन भूगोल विभाग प्रमुख प्रा. प्रज्ञा जंगले व खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी केले आहे. 
 
Web Title: marathi news jalgaon kanknakruti grahan sun
 


संबंधित बातम्या

Saam TV Live