तरुणाई व्यसनाच्या आधीन, गुन्हेगारीतही वाढ

तरुणाई व्यसनाच्या आधीन, गुन्हेगारीतही वाढ

जळगाव - सध्या तरुणाईला गांजा ओढण्याच्या व्यसनाने गुरफटून टाकले आहे. गांजा ओढण्याचे व्यसन पूर्ण करण्यासाठी घरफोडी, मोटारसायकल चोरी यांसह गुन्हेगारीच्या मार्गावर ते वळत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे या युवकांना व्यसनाच्या कचाट्यातून बाहेर काढणे सध्याच्या स्थितीत एक आव्हान बनले आहे. 

जिल्ह्यातील आदिवासी भागासह महाराष्ट्रालगत असलेल्या इतर राज्यांमध्ये गांजाची शेती केली जाते. या ठिकाणांहून गांजाची रेल्वे व खासगी वाहनांमधून तस्करी होत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. उच्चभ्रू लोकांची मुलेदेखील गांजा ओढण्याच्या अधीन गेली आहेत. हे व्यसन पूर्ण करण्यासाठी घरातून पैसे न मिळाल्यास ही मुले मोबाईल, मोटारसायकल यांसह "चैन स्नॅचिंग' अशा प्रकारचे गुन्हे करून त्यातून मिळालेल्या पैशांवर आपले व्यसन पूर्ण करीत असतात. गांजा ओढल्यानंतर व्यसन करणाऱ्याची संपूर्ण शुद्ध हरपलेली असते. या नशेतूनच अल्पवयीन मुलांसह युवकांकडून गुन्हे घडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. युवापिढीला व्यसनातून बाहेर काढणे जिकिरीचे ठरणार आहे. 

चोरीच्या घटनांमध्ये अल्पवयीन 
दिवसेंदिवस चोरी, मोटारसायकल लंपास होण्याच्या घटना वाढतच आहेत. पोलिसांकडून या घटनांवर आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र, या चोरी करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलेच अधिक प्रमाणात आढळून आले आहे. गांजा ओढण्याच्या व्यसनामुळे ही मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

सार्वजनिक ठिकाणी ठिय्या 
गांजा ओढणारी टोळी रेल्वेस्थानक, बसस्थानकासह गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंडत असतात. या ठिकाणी होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये चोरट्यांचाच समावेश असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. ही टोळी चोरी केल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या पैशांवर त्यांना जडलेले व्यसन करतात. त्यानंतर पुन्हा चोरी करण्यासाठी सक्रिय होत असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच गांजा ओढणाऱ्यांचा ठिय्या हा मोकळ्या जागेत असलेल्या पडक्‍या इमारती व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या इमारतींच्या मागे असतो. 

मुलांचे प्रमाण धक्कादायक 
सिगारेटच्या सवयीमुळे अनेकांना गांजा ओढण्याची सवय जडली आहे. गांजा ओढण्याचे सर्वाधिक प्रमाण अल्पवयीन व अविवाहित युवकांचे आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा गांजा ओढल्यानंतर त्याचा दिवसभर नशा राहतो, तसेच हे व्यसन कमी पैशांतदेखील होत असल्याने आताची युवापिढी व्यसनाच्या अधीन गेली आहे.

Web Title: Children in crime due to addiction

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com