जळगावात भाजपने कर्मचाऱ्यांसाठी जेवण नेल्यानं राष्ट्रवादी-सेना आक्रमक

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

मतदानाच्या पूर्वसंध्येला जळगावमध्ये तुफान राडा झाला. भाजप नगरसेवकानं खासगी गाडीतून केंद्रावर  जेवण नेले.

कर्मचाऱ्यांसाठी भाजपने जेवण नेल्यानं राष्ट्रवादी-सेना आक्रमक झाली. यावरुन जळगावच्या वॉर्ड क्रमांक 16मध्ये तुफान राडा झाल्याचेही पहायला मिळाले.

ज्या गाडीतून भाजप नगरसेवकानं कर्मचाऱ्यांसाठी जेवण नेलं होतं, ती गाडी पोलिसांनी जप्त केली. काही काळानंतर ही गाडी सोडण्यात आली. दरम्यान यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचं दिसतंय. दरम्यान हे मतदान केंद्र रद्द करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live