अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाबतीतही लवकरच निर्णय होईल - Ashok Chavan

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 20 एप्रिल 2019

जालना : पक्षाविरोधात काम केल्यामुळे अब्दुल सत्तार यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी  करण्यात आली असून विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाबतीतही लवकरच निर्णय होईल, अशी  घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे केली.

जालना लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (ता.20)  भोकरदन शहरात जाहीर सभा झाली. त्यानंतर पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्त्तरे देताना चव्हाण यांनी ही माहिती दिली.

सभेवेळी बोलताना चव्हाण म्हणाले, निवडणुकीच्या काळात काहीजणांनी पक्षाविरोधात भानगडी केल्या. जालना व औरंगाबाद मतदारसंघाची उमेदवारी ठरवताना सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेण्यात आला. मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अब्दुल सत्तारांनी त्यास विरोध केला. त्यानंतरही  पक्षांनी त्यांना उमदेवारी देण्याची तयारी दर्शविली. मात्र, ते औरंगाबदमधूनही उभे रहिले नाही. उलट दोन्ही ठिकाणी वेगळी भुमीका घेतली. पक्षात असे चालणार नाही.

यावेळी आमदार राजेश टोपे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, उमेवार विलास औताडे, भिमराव डोंगरे, राजाभाऊ देशमुख, यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या   पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: will take decision soon about Radhakrishn Vikhe Patil says Ashok Chavan

संबंधित बातम्या

Saam TV Live