पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये पुन्हा एकदा स्फोट

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 मार्च 2019

जम्मू- पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरमधील वातावरण तणावपूर्ण असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

जम्मूतील बस स्थानकावर हा हल्ला झाला असून या हल्यामध्ये जवळपास 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादल घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. हा हल्ला दहशतवाद्यांनीच घडवून आणला असल्याचा पोलिसांचा संशय आहे. ग्रेनेड हे बसच्या खाली लावले असल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सांगितले असून, या हल्यात जखमी झालेले वाहक आणि चालक असल्याचे सांगितले आहे.

Web Title: Grenade Attack At Bus Stand In Jammu, At Least 18 Injured

संबंधित बातम्या

Saam TV Live