जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक; बारामुल्लात जैशचा कमांडर लुकमान यमसदनी

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 23 जून 2019

भारतीय लष्करानं दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहिम उघडलीय. जम्मू-काश्मीरच्या शोपियान भागात भारतीय जवान आणि दहशतवादी पुन्हा एकदा आमने सामने आले. या कारवाईत 4 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय. तर शनिवारी बारामुला जिल्ह्यातल्या उरीत झालेल्या कारवाईत जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर लुकमान ठार झालाय. तो दक्षिण काश्मीरहून उत्तर काश्मीरच्या दिशेनं जात होता. पाकिस्तानमधून भारतात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना मदत करायला जात असताना सुरक्षा दलानं त्याचा खात्मा केला. 

लुकमान हा जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर असून 2017 मध्ये पाकव्याप्त काश्मीरमधून त्यानं भारतात घुसखोरी केली. दक्षिण काश्मीरमधील अवंतीपुरा आणि त्राल भागची जबाबदारी त्याच्यावर होती. लुकमान आयईडी एक्सपर्ट मानला जातो. आयईडीचं प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही त्याच्यावर होती. केंद्र सरकारनं टॉप 10 दहशतवाद्यांची यादी तयार केल्यानंतर लुकमान पाकिस्तानमध्ये परतण्याची तयारी करत होता. 
केंद्र सरकारनं याआधीच दहशतवाद्यांची टॉप टेन यादी जाहीर केलीय. त्यामुळे लष्कर आणि जैशच्या दहशतवाद्यांची पळता भुई थोडी झालीय. अशातच 4 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यानं भारतीय लष्कराचं आत्मविश्वास निश्चितच उंचावलाय

Web Title: Jasm's Commander Lukmann died in Baramulla

संबंधित बातम्या

Saam TV Live