INDvsNZ : 'जस्सी पाजी...ये क्या हुआ '; बुमरा पहिल्यांदाच विकेटलेस!

INDvsNZ : 'जस्सी पाजी...ये क्या हुआ '; बुमरा पहिल्यांदाच विकेटलेस!

INDvsNZ : माउंट मौंगानुई : टीम इंडियाचा जसप्रीत बुमरा याची गणना सध्याच्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. पण, न्यूझीलंड विरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये त्याला एकही विकेट घेता आली नाही, या गोष्टीची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. बुमरा सध्या वनडे क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. पण त्याला द्विपक्षीय मालिकेत एकही विकेट न मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे त्याचा या कामगिरीचा त्याच्या चाहत्यांनाच नव्हे, तर टीम इंडियाच्या सगळ्या फॅन्सना धक्का बसला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. 

India depend heavily on their two pillars. Kohli and Bumrah. By their standards, they had a quiet tour. The pluses were Rahul, Shreyas and Pandey. Chahal showed his value. But on flat decks, the support cast fell short with the ball.

— Harsha Bhogle (@bhogleharsha) February 11, 2020

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये बुमराची कामगिरी 

पाठीच्या दुखापतीतून जानेवारीमध्ये पुनरागमन केल्यावर सलग चौथ्या एकदिवसीय सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याने एकूण 30 ओव्हर बॉलिंग करताना एकही विकेट घेतली नाही. याबदल्यात त्याने 167 रन्सची खैरात न्यूझीलंडला दिली आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे त्याने फक्त एक मेडन ओव्हर टाकली आहे. भारताला व्हाईटवॉश मिळण्यामध्येही बुमराचे अपयश हे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. 

Bumrah is losing pace. His action will make sure he lose pace early.
Shami is a long term bowler.

— qutb ud din (@qutbuddinabak) February 11, 2020

गेल्या काही मॅचमधील बुमराची कामगिरी :

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : 

पहिली वनडे - ७-०-५०-० (मुंबई)

दुसरी वनडे - ९.१-२-३२-१ (राजकोट) 

तिसरी वनडे - १०-०-३८-० (बेंगलोर)

Jasprit Bumrah in

1st ODI - 10-1-53-0
2nd ODI - 10-0-64-0
3rd ODI - 10-0-50-0

Total - 30-1-167-0
Went Wicketless in All 3 Games!

Let’s Take A Moment & Congratulate NZ 12th Man For His Consistent Disasters Which Helped NZ To Whitewash IND Comprehensively...#NZvIND  pic.twitter.com/UrbJK6g5cy

— CriCkeT KinG (@imtheguy007) February 11, 2020

भारत विरुद्ध न्यूझीलंड :

पहिली वनडे - १०-१-५३-० (हॅमिल्टन) 

दुसरी वनडे - १०-०-६४-० (ऑकलंड)

तिसरी वनडे - १०-०-५०-० (बे ओव्हल) 

Name- @BLACKCAPS
Work- Whitewash.
After being whitewashed in T20's , great effort from New Zealand to whitewash India in the One day Series.
Bumrah being wicketless in the series was a big factor. #NZvIND

— Virender Sehwag (@virendersehwag) February 11, 2020

दरम्यान, २१ फेब्रुवारीपासून न्यूझीलंडविरुद्धची टेस्ट सीरिज सुरू होणार आहे. यामध्ये तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष्य राहणार आहे. कारण आगामी ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धा पार पडणार आहे. यादृष्टीने टीम इंडिया आपली कामगिरी उंचावण्यावर भर देईल, अशी आशा आहे.

Bumrah against Bumrah against
WI/SL AUS/NZ pic.twitter.com/ycXtvYjINP

— Amy (@Middlclassmogly) February 11, 2020

Web Title Jasprit Bumrah Goes Wicketless In ODI As India Receive Whitewash From New Zealand

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com