जयंत आठवलेंच्या चौकशीची शक्यता; दाभोलकर-पानसरे हत्येप्रकरणात महत्वाची माहिती एटीएसच्या हाती

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि काँम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी जयंत आठवले एटीएसच्या रडारवर आलेत. एटीएसमार्फत जयंत आठवलेंची चौकशी होण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर काही लोकांचीही चौकशीही केली जाणारंय. एटीएसच्या पत्रकार परिषदेनंतर ही माहिती समोर येतीय.  

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील चारही विचारवंतांच्या हत्येचा मूळ सूत्रधार शोधायचा असेल तर पोलिसांनी सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना अटक करून चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षऩेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय.

डॉ. दाभोलकरांसारख्या विचारवंतांची हत्या करणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर आज पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण मागील काही महिन्यांमध्ये अशा सुमारे 500 तरूणांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात आलं असून, ते अजूनही मोकाट आहेत. त्यांना शोधून काढायचे असंल तर पोलिसांनी डॉ. जयंत आठवले यांना ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे. कट्टरवादी संघटनांना वेसण घालण्यासंदर्भात सरकारची भूमिका प्रामाणिक असेल तर अटकेची ही कारवाई तातडीने केली जाईल, असंही त्यांनी म्हंटलं होतं. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live