जयंत पाटील उपमुख्यमंत्री तर अजित पवारांना अर्थ खातं?

जयंत पाटील उपमुख्यमंत्री तर अजित पवारांना अर्थ खातं?

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री आणि खातेवाटप अजून काही निश्चित होत नाहीय. मात्र आता आणखीनच चुरस यात पहायला मिळतेय. आता एक नवी चर्चा राजकारणाच्या वर्तुळात रंगलीय. ती म्हणजे उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांना देणार असल्याचे जवळ जवळ संकेत असताना आता नवीन नाव समोर येतंय. ते नवीन नाव म्हणजे जयंत पाटील. उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे देण्यात येणार आहे. जयंत पाटील शरद पवार यांची पसंती असून अजित पवार यांच्यावर अर्थमंत्रिपदाची जबाबदारी टाकण्यात येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या वाट्याला आलेले महसूलमंत्रिपद प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाच मिळणार असल्याचे काँग्रेस सूत्रांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्या मंत्रिपदाविषयी अजून चित्र स्पष्ट झालेले नाही. चांगली मंत्रालये मिळाल्यास पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण मंत्री होण्यास उत्सुक असून त्यामुळे सत्तेत भागीदारी करणाऱ्या काँग्रेसला अनुभवाची कमतरता भासणार नाही, असा काँग्रेस नेत्यांकडून तर्क देण्यात येत आहे.

विधिमंडळाच्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊ घातले असून उपमुख्यमंत्रिपदाची तसेच गृहमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपविली जाणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून देण्यात आले आहेत. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थखाते अजित पवार यांना देण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेसश्रेष्ठींशी चर्चा करून तिन्ही पक्षांच्या वाट्याला येणारी खातीही निश्चित केली आहेत. त्यानुसार शिवसेनेला दहा, राष्ट्रवादी काँग्रेसला सात, तर काँग्रेसला सहा मंत्रालये मिळणार आहेत.

गेल्या तीन-चार दिवसांपासून शरद पवार यांनी मुंबई आणि दिल्लीत काँग्रेस तसेच शिवसेना नेत्यांशी चर्चा करून मंत्रालयांचे वाटप निश्चित केले. मंत्रालयांच्या वाटपाच्या सूत्रात शेवटच्या क्षणी काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही समजते. या खातेवाटपावर काँग्रेसश्रेष्ठी समाधानी असल्याचे समजते. निश्चित झालेल्या खातेवाटपानुसार, शिवसेनेला नगरविकास, उच्च व तंत्र शिक्षण, जलसंपदा, राज्य रस्ते विकास महामंडळ, परिवहन, उद्योग, सामान्य प्रशासन, विधी, सांस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा अशी दहा मंत्रालये मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गृह, अर्थ, ग्रामीण विकास, सहकार, गृहनिर्माण, वैद्यकीय शिक्षण आणि कामगार अशा विभागांची जबाबदारी येणार आहे. काँग्रेसला महसूल, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, उत्पादन शुल्क, शालेय शिक्षण तसेच महिला आणि बालकल्याण मंत्रालये सोपविली जाणार आहेत.

Web Title - Jayant Patil Deputy Chief Minister; Ajit Pawar to the finance department

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com