जयंत पाटीलच राष्ट्रवादीचे गटनेते

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

भागवत यांच्या माहितीमुळे भाजपच्या स्वप्नांना मोठा धक्का बसला आहे. आता विधिमंडळात बहुमत सिद्ध करताना भाजप कोठून आकडा जमा करणार हा प्रश्न आहे. कोणत्याही परिस्थितीत विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपने दोन प्लॅन तयार केले आहेत.
 

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा संघर्ष शिगेला पोचला असतानाच अजित पवारांच्या साथीने सत्तेत सहभागी झालेल्या भाजपला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते हे जयंत पाटीलच असतील, त्यामुळे तेच व्हिप बजावू शकतील असे स्पष्ट झाले आहे.

विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले, की विधिमंडळात सचिवालयात राष्ट्रवादी पक्षाचे विधिमंडळ गटनेते म्हणून जयंत पाटील यांची अधिकृत नोंद झाली आहे. राष्ट्रवादीने जयंत पाटलांच्या निवडचे अधिकृत पत्र सोमवारी आम्हाला दिले आहे. त्यानुसार तेच गटनेते असतील. त्यामुळे ते किंवा त्यांनी ज्यांची प्रतोद म्हणून निवड केली असेल त्यांचाच व्हिप अधिकृत असेल. पक्षाचा अध्यक्ष किंवा जनरल सेक्रेटरी विधिमंडळ गटनेता किंवा पक्षाचा गटनेता यांची निवड करतो. 

 

भागवत यांच्या माहितीमुळे भाजपच्या स्वप्नांना मोठा धक्का बसला आहे. आता विधिमंडळात बहुमत सिद्ध करताना भाजप कोठून आकडा जमा करणार हा प्रश्न आहे. कोणत्याही परिस्थितीत विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपने दोन प्लॅन तयार केले आहेत. यापैकी पहिल्या प्लॅनमध्ये बहुमतासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील आमदार फोडणे आणि हा प्लॅन फेल झाल्यास तांत्रिक बाबींवर विरोधकांवर मात करण्याची भाजपने तयारी केली आहे. पण, आता हा प्लॅनही यशस्वी होताना दिसत नाही. 

 
देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदी शपथविधी पार पडल्यानंतर त्यांना विधानसभा अधिवेशनात सरकारचे बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सध्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने 162 आमदारांचे संख्याबळ असल्याचे पत्र तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपालांकडे दिले आहे. त्यामुळे साहजिकच भाजपला अतिरिक्‍त कोणते आमदार मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. गेल्या एक महिन्यापासून भाजप नेत्यांनी अन्य पक्षांतील आमदार मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. तरीही, बहुमतासाठी आमदार मिळविण्याचे प्रयत्न भाजपने सोडले नसल्याचे सांगण्यात येते. 

Web Title: Jayanty leader says assembly secretary Rajendra Bhagwatt Patil is NCP legislative par


संबंधित बातम्या

Saam TV Live