देशावर जैश-ए-मोहम्मदचा भ्याड हल्ला; भीषण हल्ल्यात १८ जवान शहीद 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

जम्मू-काश्मीरच्या पुलवामात सीआरपीएफच्या एका तुकडीवर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केलाय. या भ्याड हल्ल्यात अनेक जवान शहीद झालेत. अवंतीपुराजवळच्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी एकत्रित हल्ला चढवला.

वानांची बस ज्या रस्त्यावरून जाणार होती, त्या ठिकाणी रस्त्यावर एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्ब ठेवला होता.

जवानांची बस या गाडीजवळ येतात त्या कारचा स्फोट झाला. आणि या हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले.

जखमी जवानांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरूयत. सीआरपीएफच्या ताफ्यात जवळपास २५०० जवान होते, त्यातल्या एका तुकडीवर हा भ्याड हल्ला करण्यात आलाय.

उरी हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. उरी हल्ल्यात तब्बल १९ जवान शहीद झाले होते. या वर्षातला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. 

जैश-ए-मोहम्मदच्या या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येतोय. हे दहशतवादी हल्ले नेमके कधी थांबणार, कधीपर्यंत देशाचे वीर जवान मातृभूमीसाठी शहीद होत राहणार हाच खरा प्रश्न आहे.

WebTitle : marathi news JEM attacks india in Pulwama 18 CRPF jawan died 

संबंधित बातम्या

Saam TV Live