इथं विमानं भाड्याने मिळतील..

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

मोठय़ा कर्जभाराने आर्थिक स्थिती डगमगलेली जेट एअरवेज आपल्या मालकीची सात विमाने भाडय़ाने देण्याच्या तयारीत आहे. याबाबत TruJet या हवाई सेवेबरोबर कंपनीच्या वाटाघासाठी सुरू असल्याची माहिती आहे.

खर्चात कपातीबरोबरच महसूल वाढीकरिता जेट एअरवेज हे पाऊल उचलणार असल्याचे समजते. ही सात विमाने काही कर्मचारी तसेच देखभाल आणि विमाछत्रासह दिली जाण्याची शक्यता आहे.

जेट एअरवेजच्या ताफ्यात एटीआर जातीची सध्या 15 विमाने आहेत. TruJet बरोबरचा भाडेकराराचा व्यवहार चालू महिनाअखेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

WebTitle : marathi news jet airways to rent out seven aircraft to trujet

संबंधित बातम्या

Saam TV Live