'जिओ'मुळे ‘एअरसेल’ला टाळे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

मुंबई:'जिओ'मुळे आता आणखी एका दूरसंचार कंपनीवर ‘टाळे' लावण्याची वेळ आली आहे. . दूरसंचार कंपनी ‘एअरसेल’ने दिवाळखोर जाहीर करावे यासाठी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडे अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी कंपन्यांच्या पाच हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. 'जिओ'ने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केल्यांनतर इतर दूरसंचार कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. जिओच्या दूरसंचार क्षेत्रातील प्रवेशानंतर बंद पडलेली ही चौथी टेलिकॉम कंपनी आहे.

‘एअरसेल’वर सध्या सुमारे 15 हजार कोटींचे कर्ज आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या संचालक मंडळाने आता कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडे दिवाळखोर घोषित करावे यासाठी याचिका दाखल करणार आहे. मात्र कंपनीकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

एअरसेलकडून गेल्यावर्षी सप्टेंबरपासून बँकांशी कर्जाच्या पुनर्रचनेसंदर्भात चर्चा सुरु होती. मात्र, त्याला यश आलेले नाही. कंपनीची महिन्याची कमाई 400 कोटी रुपये इतकी आहे. यातील 100 कोटी रुपये अन्य ऑपरेटर्सना टर्मिनेशन चार्जेस म्हणून द्यावे लागतात. तर 280 कोटी रुपये व्हेंडर्स आणि नेटवर्क अपटाइमसाठी द्यावे लागतात. उर्वरित रक्कम परवाना शुल्क, कर आणि व्याजापायी भरावी लागते. गेल्या महिन्यात आयडियानेही एअरसेलशी इंटरकनेक्ट सर्व्हिसेस ही सुविधा निलंबित केली होती. एअरसेलने शुल्क थकवल्याने ही कारवाई करण्यात आली होती. एअरसेलनेही सहा सर्कलमधील सेवा बंद केली होती.

संबंधित बातम्या

Saam TV Live