केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये तब्बल २४ लाख जागा रिकाम्या

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

अख्ख्या देशात तीन कोटींहून अधिक तरुण बेरोजगार असतानाच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये तब्बल २४ लाख जागा रिकाम्या पडून असल्याचे उजेडात आले आहे.

मात्र भाजप सत्तेवर आल्यास एक कोटी नोकऱया तरुणांना देईल असे आश्वासन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रिकाम्या जागा भरण्यासाठी नोकरभरतीसाठी हालचाल करताना दिसत नाहीत.

नोकऱ्यांतील रिकाम्या जागांची धक्कादायक आकडेवारी मोदी सरकारकडूनच संसदेत वेळोवेळी सादर केलेल्या माहितीच्या संकलनातून बाहेर आली आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकऱयांतील सर्वाधिक रिकाम्या जागा या शिक्षण क्षेत्रातील आहेत. त्यावरून शिक्षण क्षेत्राबाबतचा सरकारचा अनास्थेचा दृष्टिकोनही समोर आला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live