नोकरभरती ऑफलाईनच होणार, मुख्यमंत्र्यांचा रोहित पवारांना शब्द

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 मार्च 2020

नगर : राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांचा अॉनलाईन नोकरभरती प्रक्रियेस विरोध आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पोर्टलद्वारे भरती करण्यात आली होती. त्यात घोटाळा असल्याचा संशय आहे. त्यामुळे चांगल्या उमेदवारांवर अन्याय होतो, असे अनेकांचे मत आहे. रोहीत पवार यांनी या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत हा प्रश्न कानावर घातला.

लवकरच महारभरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. त्याची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. महापोर्टलवर नोंदणी केलेल्या तरुणांनाही या भरतीत प्रक्रियेत सामावून घेण्यात यावं आणि ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’तील सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात आणि ‘एमपीएससी’च्या माध्यमातून जी पदं भरली जातात त्या पदांची रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणीही यावेळी मुख्यमंत्री महोदयांकडे केली. आपल्या मागणीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पाऊल उचलल्याचेही रोहीत पवार आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात.

आमदार पवार फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात,  महापोर्टल’च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या नोकर भरतीचा वाईट अनुभव आहे. राज्यातील तरुणांचा ऑनलाइन नोकरभरतीला तीव्र विरोध आहे. अनेक तरुणांनी मला, अन्य आमदारांना व नेत्यांना भेटून ऑफलाईन भरती करण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करण्याची मागणी केली होती.

त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली.  ते म्हणाले, “रोहित याबाबत तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही तसं सांग. यापुढे होणारी भरती प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल.”

मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या या आश्वासनामुळे मी त्यांचे आभार मानतो. यामुळे अधिकाधिक तरुणांना नोकरभरतीच्या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. याशिवाय भरती करताना एका दिवशी एकाच पदासाठी संपूर्ण राज्यात परीक्षा घेण्यास सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितल्याचीही माहिती पोस्टमध्ये लिहिली आहे.

Web Title: marathi news Jobs will be taken offline, Chief Minister Rohit Pawar's words

संबंधित बातम्या

Saam TV Live