जॉन अब्राहमनं कोस्टल रोडवरुन शिवसेनेशी घेतला पंगा

रामनाथ दवणे, साम टीव्ही  मुंबई
शनिवार, 13 जुलै 2019
  • शिवसेना विरुद्ध जॉन अब्राहम 'सामना' 
  • कोस्टल रोडला जॉन अब्राहमचा विरोध
  • 'मेट्रो कारसाठी झाडं तोडणं चमत्कारिक'

बॉलिवुडचा एक्शन हिरो अशी ओळख असलेल्या जॉन अब्राहमनं कोस्टल रोडवरुन शिवसेनेशी पंगा घेतलाय. कोस्टल रोड, उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट. अनेक अडथळ्यानंतर काही दिवसांपूर्वीच कोस्टल रोडचं काम सुरु झालंय. मात्र, या कोस्टल रोडला अभिनेता जॉन अब्राहमनं विरोध केलाय.

मेट्रो-३च्या कारशेडसाठी आरे कॉलनीत झाडं तोडण्याच्या सरकारच्या निर्णयावरही त्यानं आश्चर्य व्यक्त केलंय. बाटला हाऊस या  सिनेमाच्या ट्रेलर रिलीजवेळी पाणीटंचाई संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जॉन अब्राहम यानं आपली रोखठोक भूमिका मांडली. 

दरम्यान,  जॉन अब्राहमनं घेतलेल्या या भूमिकेवर शिवसेनेनं त्याला माहिती घेऊन बोलण्याचा सल्ला दिलाय

जॉनचा बाटला हाऊस सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय..बाटला हाऊस सिनेमाची त्याच्या चाहत्यांना प्रतिक्षा आहे. मात्र, त्याआधी त्यानं घेतलेल्या या भूमिकेवरुन  शिवसेना विरुद्ध जॉन अब्राहम असा सामना रंगण्याची शक्यता आहे. 

WebTitle : marathi news john abraham opposes tree slaughtering for metro car shade 


संबंधित बातम्या

Saam TV Live