पत्रकार रवीश कुमार यांना 'रॅमन मॅगसेसे 2019' पुरस्कार जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

नवी दिल्ली : प्रसिद्ध पत्रकार रवीश कुमार यांना प्रतिष्ठेचा 'रॅमन मॅगसेसे 2019' हा पुस्कार जाहीर झाला आहे. तळागाळातील वंचितांसाठी पत्रकारितेचा प्रभावी वापर‌ केल्याबद्दल‌ रविश कुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार‌ जाहीर झाला आहे.‌ फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे या पुरस्काराचे 9 सप्टेंबरला वितरण होईल. आज (ता. 2) या पुरस्काराच्या नावांची घोषणा झाली.   

रवीश कुमार हे रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळणाऱ्या पाच मान्यवरांपैकी एक असतील. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीची चेहरा समजले जाणारे रवीश कुमार 'इंडियाज् प्राईम टाईम शो' प्रवाभीपणे चालवतात. यामुळेच त्यांना मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे रॅमन मॅगसेसे फाऊंडेशनने सांगितले आहे. 'सत्यासाठी उभे राहणे, नैतिक पत्रकारिता, नैतिक धैर्य, तथ्यावर आधारित पत्रकारिता, वंचितांचा आवाज बनून त्यांचे प्रश्न सरकासमोर मांडणे या विशेष कारणांसाठी त्याला मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे,' असे फाऊंडेशनने सांगितले. 

रवीश कुमार यांच्यासह म्यानमारमधील पत्रकार को स्वी विन, थाई हक्कांसाठी काम करणारे अगाखान निलापैजीत, दक्षिण कोरियातील समाजसेवक किम जाँग की आणि फिलिपीनमधील संगीतकार रेमुंडो पुंजाते केब्याब यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

1975 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कारास सुरवात झाली. लोकशाहीत जनहितार्थ आणि निरपेक्ष काम करणाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान कण्यात येतो. 

WebTitle : marathi news journalist ravish kumar conferred with Ramon Magsaysay Award

संबंधित बातम्या

Saam TV Live