न्यायमूर्ती ब्रिजमोहन हरिकिशन लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची SIT चौकशी होणार नाही 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 एप्रिल 2018

न्यायमूर्ती ब्रिजमोहन हरिकिशन लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची SIT चौकशी होणार नाही असा स्पष्ट निर्णय सुप्रीम कोर्टाने आज दिला. न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. विशेष सीबीआय न्यायाधीश लोया हे सोहराबुद्दीन बनावट एन्काऊंटरच्या खटल्याची सुनावणी करत होते. या खटल्यात भाजप अध्यक्ष अमित शाहा आरोपी होते. न्या.

न्यायमूर्ती ब्रिजमोहन हरिकिशन लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची SIT चौकशी होणार नाही असा स्पष्ट निर्णय सुप्रीम कोर्टाने आज दिला. न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. विशेष सीबीआय न्यायाधीश लोया हे सोहराबुद्दीन बनावट एन्काऊंटरच्या खटल्याची सुनावणी करत होते. या खटल्यात भाजप अध्यक्ष अमित शाहा आरोपी होते. न्या. लोया यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होणार नाही, हे सांगतानाच, सुप्रीम कोर्टाने जनहित याचिकेचा गैरवापर होत असल्याचं नमूद केलं. न्यायमूर्ती लोयांसोबत जे न्यायाधीश प्रवास करत होते, त्यांच्यावर संशय व्यक्त करु शकत नाही. ज्या पद्धतीने जनहित याचिकांचा राजकीय वापर होत आहे, ते पाहता हा न्यायपालिकांच्या बदनामीचा प्रयत्न आहे, असं न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी नमूद केलं.  इतकंच नाही तर मीडिया रिपोर्टवरुन हा खटला ताणण्याचा प्रयत्न होत आहे, असंही कोर्टाने खडसावलं.


संबंधित बातम्या

Saam TV Live