देशभरातील कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जंक फूड विक्रीस पूर्ण बंदी करण्याचे निर्देश 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

देशभरातील सर्व विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये आणि अन्य उच्च शिक्षण संस्थांच्या कॅम्पसमध्ये जंक फूड म्हणजेच चमचमीत परंतु सत्वहीन अन्नपदार्थांच्या विक्रीस पूर्ण बंदी करण्याचे निर्देश यूजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगानं दिले आहेत.

केवळ कॉलेजच्या कॅन्टिनमध्येच नव्हे तर विद्यार्थ्यांनी एरवीही ‘जंक फूड’चा त्याग करावा यासाठी त्यांचे समुपदेशन करून आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्यावरही आयोगाने भर दिलाय.

विद्यापीठे आणि कॉलेजांमध्ये ‘जंक फूड’ला बंदी केल्यानं आरोग्यदायी खाद्यपदार्थांचे नवे मापदंड प्रस्थापित होतील. याने विद्यार्थ्यांचे आयुष्य अधिक आरोग्यसंपन्न होईल, ते अधिक चांगला अभ्यास करू शकतील व त्यांच्यातील अतिलठ्ठपणाचे प्रमाणही कमी होईल. असं आयोगाचं म्हणणं आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live