कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालय तसंच घरांवर पोलिसांच्या धाडी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पुणे येथे 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेप्रकरणी कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालय आणि घरावर पोलिसांच्या धाडी सुरू आहेत. पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे दलित समाजातील लोकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती. त्या घटनेचे पडसाद म्हणून 3 जानेवारी रोजी राज्यभरात बंद पाळण्यात आला होता. या घटनेनंतर 7 जानेवारी 2018 रोजी कबीर कला मंचाच्या चार आणि रिपब्लिकन पँथरच्या चौघांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

पुणे येथे 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेप्रकरणी कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालय आणि घरावर पोलिसांच्या धाडी सुरू आहेत. पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे दलित समाजातील लोकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती. त्या घटनेचे पडसाद म्हणून 3 जानेवारी रोजी राज्यभरात बंद पाळण्यात आला होता. या घटनेनंतर 7 जानेवारी 2018 रोजी कबीर कला मंचाच्या चार आणि रिपब्लिकन पँथरच्या चौघांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यात प्रकरणी पहाटे पासून पुण्यातील कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर आणि मुंबईत रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयावर पुणे पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत. 


संबंधित बातम्या

Saam TV Live