आली रे आली तडकड ताई, भुताची आई

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 15 जुलै 2018

अंगावर साडी, तोंडावर काळा मुखवटा, हातात सूप घेऊन सांगली शहरात धावणारी ही आहे तडकडताई. तडकड ताई, भुताची आई, असा गजर करत लहान मुलं या तडकडीचं स्वागत करतायत. जेष्ठ महिन्यात अमावस्येला सांगलीत भावई यात्रेत जोगण्या उत्सवाला सुरुवात झालीय. आणि म्हणून ही तडकडताई अवतरलीय.

जोगण्या उत्सव हा जेष्ठ अमावास्येला संध्याकाळी 4 वाजता सुरु होतो. कुंभार घराण्याकडे तडकडीचा हा मान आहे. संध्याकाळी ६ वाजता या तडकडताईच्या लग्नासाठी शेकडो आबालवृद्ध हजर असतात. सूर्य अस्ताला जात असताना गव्हाच्या अक्षतांनी तिचा विवाह पार पडतो. त्यानंतर खोड्या करणाऱ्या बालकांना ती आपल्या सुपने प्रसाद देते. या सुपाचा मार बसला की मुलांवरील इडा पिडा टळते अशी अख्याइका आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live