कडकनाथप्रकरणी  शेतकऱ्यांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक; पाटणमध्ये गुन्हा दाखल

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

पाटण - कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून पाटण तालुक्‍यासह जिल्ह्यातील ७२ शेतकऱ्यांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी इस्लामपूर येथील रयत ॲग्रो इंडिया व महारयत ॲग्रो इंडिया कंपनीचे संस्थापक सुधीर मोहिते, संदीप मोहिते, गणेश शेवाळे यांच्या विरोधात आज पाटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  झाला. या प्रकरणी सचिन शिर्के (रा. नेरळे, ता. पाटण) यांनी फिर्याद दिली आहे. 

हा राजकीय डाव - खोत
या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत कसून चौकशी करण्याची मागणी मी स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटून केली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, ही माझी भावना आहे. असे कृषी राज्यमंत्री सदभाऊ खोत यांनी सांगितले. 

WebTitle : marathi news kadaknath poultry farming case regestered on five in patan 

संबंधित बातम्या

Saam TV Live