भाविकांच्या गर्दीमुळे कळसुबाई शिखरावर चेंगराचेंगरीची भीती

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर म्हणून कळसुबाई शिखराची ओळख आहे. याच शिखरावर कळसुबाई देवीचं मंदिर आहे. नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी जाण्याऱ्या भाविकांची संख्या वाढलीय.

ही संख्या एवढी आहे की माणसांना सरकायला जागा राहत नाही. कळसुबाई शिखराची वाट अवघड आहे. अनेक ठिकाणी पायवाट निसरडी आहे. दोन ठिकाणी तर शिड्या आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची संख्या एवढी आहे की भक्तांना पुढं सरकायला वाट मिळत नाही. या गर्दीत चेंगराचेंगरीसारखी कोणतीही अप्रिय दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

शिखरावर जाणाऱ्या भाविकांमध्ये शिस्तीचा अभाव आहे. त्यामुळं पोलिस आणि जिल्हा प्रशासनानं एखादी दुर्घटना घडण्याअगोदर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live