कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला जाग; रस्ते दुरुस्तीच्या कामांना अखेर सुरवात

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 जुलै 2018

खराब रस्त्यामुळे पाच नागरिकांचे बळी घेतल्यानंतर कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने रस्ते दुरुस्तीचं कामं युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा केलाय. तर दुसरीकडे शहरात 50 ठिकाणी पालिका प्रशासनाकडून सावधान फलक लावण्यात आलेत.

दरम्यान खड्डे भरण्याची जबादारी पूर्ण करण्याऐवजी नागरिकांनाच डोळे उघडे ठेवून वाहन चालवण्याचा सल्ला दिल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येतोय. 

खराब रस्त्यामुळे पाच नागरिकांचे बळी घेतल्यानंतर पालिका प्रशासनाने रस्ते दुरुस्ती करिता तब्बल 14 कोटी 29 लाखांचा निधी मंजूर केला आहे. महापालिकेचा दावा आहे की शहरात 529 खड्डे आहेत आणि त्यामधील 383 खड्डे बुजविण्यात आले आहेत.

तरी सुद्धा कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाने शहरात 50 ठिकाणी सावधान फलक लावण्यास आले आहेत सुरूवात केली आहे. एकीकडे 70 टक्के खड्डे भरल्याचा दावा आणि दुसरीकडे हे सावधानीचे फलक बघून नागरिक मात्र हैराण झाले आहेत. 
 
WebTitle : marathi news kalyan dombivali potholes KDMC 

संबंधित बातम्या

Saam TV Live