कल्याण - द्वारली गावाजवळचा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 जुलै 2018

कल्याण मलंग रोड वरील द्वारली गावाजवळील रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याने वर्षभरात तब्बल चौघांचा बळी घेतला आहे. स्थानिकांकडून रस्ते कामाला होणारा विरोध, आणि उदासीन प्रशासन यामुळे एका पादचाऱ्याला हकनाक जीवाला मुकावं लागलं आहे. अण्णा नावाच्या व्यक्तीचा रस्त्यावरील खड्ड्यात पाय मुरगळला आणि तो खाली पडला. तितक्यात मागून आलेल्या ट्रकखाली तो सापडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

खड्ड्यांच्या प्रश्नावरून हायकोर्टाकडून महापालिका आणि प्रशासनाला खडसावण्यात आलंय. 31 जुलैपर्यंत स्वतंत्र खड्डे तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करा. असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्यातील सर्व पालिका प्रशासन आणि संबंधित सरकारी यंत्रणांना दिलेत. त्यामुळे आता तरी खड्ड्यांचा प्रश्न सुटतील अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही. 

संबंधित बातम्या

Saam TV Live