'नथुराम गोडसे पहिला हिंदू दहशतवादी' ; कमल हसनकडून हिंदू धर्माची बदनामी

विकास काटेसह आणि अमोल कविटकर
सोमवार, 13 मे 2019

लोकसभा निवडणुकीचा प्रचार खरा गाजला तो नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर पातळी सोडून  टीका केली. यामध्ये आता अभिनेते आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे प्रमुख कमल हसन यांच्या वादग्रस्त वक्तव्याची भर पडली. कमल हसन यांनी नथुराम गोडसेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय.

तामिळनाडूतील अरिवाकुरिची इथल्या एका प्रचार सभेत कमल हसन यांनी केलेल्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात. कमल हसन यांनी हिंदू धर्माची बदनामी केल्याची टीका शिवसेनेनं केली. तर भाजपनंही तीव्र नाराजी व्यक्त केलीय

शिवसेना-भाजपने कमल हसन यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध केलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र जोरदार समर्थन केलंय

लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात असताना कमल हसन यांनी हे वक्तव्य करुन नव्या वादाला तोंड फोडलंय. हा वाद आणखी चिघळणार असंच दिसंतय. 

WebTitle : marathi news Kamal Haasan says nathuram godase is first hindu terrorist 

संबंधित बातम्या

Saam TV Live