कमल हसन आता राजकारणाच्या मैदानात

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

तमिळ आणि हिंदी चित्रपटातील अभिनेते, पटकथालेखक आणि दिग्दर्शक राहिलेले कमल हसन आता राजकारणाच्या मैदानात उतरणार आहेत. आज ते आपल्या नव्या पक्षाची घोषणा करणार असून, त्यांच्या या घोषणेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंयं. दरम्यान माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि महात्मा गांधी हे आपले आदर्श असून राजकारणात आपण फक्त लोकसेवेच्याच भावनेनं उतरत आहोत असंही त्यांनी सांगितलंय... दक्षिणेत चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार नंतर राजकारणात येतात आणि आता कमल हसन हेही या परंपरेत सामील होणार आहेत.

तमिळ आणि हिंदी चित्रपटातील अभिनेते, पटकथालेखक आणि दिग्दर्शक राहिलेले कमल हसन आता राजकारणाच्या मैदानात उतरणार आहेत. आज ते आपल्या नव्या पक्षाची घोषणा करणार असून, त्यांच्या या घोषणेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंयं. दरम्यान माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि महात्मा गांधी हे आपले आदर्श असून राजकारणात आपण फक्त लोकसेवेच्याच भावनेनं उतरत आहोत असंही त्यांनी सांगितलंय... दक्षिणेत चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार नंतर राजकारणात येतात आणि आता कमल हसन हेही या परंपरेत सामील होणार आहेत. जयललिता यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडूच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालीय आणि ती भरून काढण्यासाठी कमल हसन पुढे सरसावलेत.


संबंधित बातम्या

Saam TV Live