कामोठेवायिसांनी रोखून धरला सायन-पनवेल महामार्ग

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

कामोठेवायिसांनी रोखून धरला, ४ वर्षांपासून रखडलेलं रस्त्याचं काम पूर्ण करा, आंदोलनकर्त्यांची मागणी

पनवेलमध्ये कामोठ्याजवळ रास्तारोको करण्यात आलाय. सायन पनवेल मार्गाचे रखडलेले काम पुर्ण करावे ह्या मागणी करत, कामोठ्यात रास्तारोको करण्यात आलाय. गेल्या ४ वर्षांपासून सायन पनवेल मार्गावरील कामोठेजवळ काम रखडलेलंय. त्यामुळे या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होते. दरम्यान हे काम मार्गी लावावे या मागणीकरता कामोठे वासीयांनतर्फे रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतुक काही काळ विस्कळीत झाली आहे. सायन पनवेल मार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम गेली चार वर्ष रखडले असल्याने कामोठेवासीयांना मुंबईला जाण्याकरता उलट्या दिशेने प्रवास करावा लागतो. आता पर्यंत ह्या ठिकाणी झालेल्या अपघातात 28 जणांना नाहक आपले प्राण गमावण्याची वेळ आली आहे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live