कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही - बेताल कंगनाची गृहमंत्र्यांकडून कानउघडणी

साम टीव्ही
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020
  • कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही 
  • कंगनासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांचं मोठं वक्तव्य
  • कंगनाची मुंबईबाबतची भूमिका अयोग्य

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगना रनौतला चांगलच झापलंय. मुंबईबद्दल मनात येईल ते वक्तव्य करणाऱ्या कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकारच नाही असं ते म्हणाले आहेत. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड पोलिसांशी केली जाते. कोरोना काळातही मुंबई पोलिस उत्तम काम करत आहेत. अनेक पोलीस कर्मचारी शाहिदसुद्धा झालेत. मात्र, कंगनासारखे कलाकार मुंबई पोलिसांची बदनामी करताहेत. त्यांचा आम्ही धिक्कार करतो, असं गृहमंत्र्यांनी म्हटलंय.

मुंबईची तुलना कंगना रनौतने पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रातून तिच्याबद्दल अत्यंत तिखट प्रतिक्रीया येत आहेत. मुंबईनं सर्वकाही देऊनही ही कंगनाचा हा कांगावा सर्वसामान्यांना पटलेला नाही. त्यामुळं आता कंगनानं या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी सर्वस्तरातून होतेय.

पाहा सविस्तर व्हिडिओ -


संबंधित बातम्या

Saam TV Live