आता नवा सामना.. बच्चन विरुद्ध बोलबच्चन, कंगनाचं नाव न घेता बिग बींचा टोला

साम टीव्ही
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

 

  • आता नवा सामना.. बच्चन विरुद्ध बोलबच्चन..
  • कंगनाचं नाव न घेता बिग बींचा टोला
  • ठाकरे सरकार अमिताभला पुरवणार सुरक्षा

कंगना आणि बच्चन परिवाराचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे, कारण आता ट्रोलर्सना प्रत्युत्तर द्यायला खुद्द बिग बी अमिताभ बच्चन मैदानात उतरलेत. असं काय केलंय. शहेनशाहा बच्चन यांनी.

कंगना विरुद्ध बच्चन हा वादा आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कारण बिग बी अमिताभ बच्चन यांनी कंगनाचं नाव न घेता ट्विटरवर तुफान टोलेबाजी केलीय. एकामागोमाग एक 3 ट्विट्स अमिताभ यांनी केलीयेत. ट्विटमध्ये अमिताभ म्हणतात...

सागर को घमंड था की मैं, सारी दुनिया को डुबा सकता हूँ।
इतने में तेल की एक बूँद आयी, और तैर कर निकल गयी।।"

इतक्यावरच बिग बी थांबले नाहीत.. तर त्यांनी आणखी एका शायरीतून कंगनावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय.

“झूठे हैं लोग जो सुबह को शाम, शाम को अंधेरे कहते हैं 
देखा है हमने चिराग़ों से जलने वाले चिराग़ों को घेरे रहते हैं  

दुसरीकडे जया बच्चन यांनी ड्रगसंबंधी संसदेत केलेल्या विधानानंतर राज्यातही घडामोडींना वेग आलाय. जया बच्चन यांना सोशल मीडियातून प्रखर विरोधाचा सामना करावा लागला. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार जया बच्चन यांच्यासह महाराष्ट्र सरकारला सुरक्षा देण्याच्या तयारीत आहे. मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी बच्चन कुटुंबियांना पोलिस संरक्षण देण्याबाबत सुतोवाच केलंय.

यापूर्वी कंगनाला जेव्हा केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली होती, तेव्हा जोरदार टीका झाली होती. आता ठाकरे सरकारनं बच्चन परिवाराला सुरक्षा दिली तर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे बच्चन विरुद्ध कंगना हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live