ठरलं कन्हैय्या कुमार कोठून निवडणूक लढवणार

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 2 सप्टेंबर 2018

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. कन्हैया कुमार हा बिहारमधल्या बेगुलसराय मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. याबाबतीत डाव्यांमध्ये एकमत झाले आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तिकीटावर तो निवडणुक लढवेल. तर, काँग्रेस, राजद आणि डाव्या संघटना या महाआघाडीकडून कन्हैय्या कुमारला पूर्ण पाठींबा असेल. लालू प्रसाद यादव यांचाही कन्हैया कुमारच्या उमेदवारीवर कुठल्याही प्रकारचा आक्षेप नसल्याचे बोलले जात आहे. सध्या बेगुलसराय लोकसभा मतदारसंघावर भाजपचे भोला सिंह खासदार आहेत. त्यामुळे कन्हैया कुमारची ही लढाई थेट भाजप विरोधातच असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी कन्हैया कुमारने, जर बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, कॉंग्रेस आणि डाव्या संघटनांनी महाआघाडी स्थापन केली तर मी निवडणूक लढवण्यास तयार आहे असे स्पष्टीकरण दिले होते. त्यामुळे, त्याच्याकडून अजून निवडणूक लढण्याबाबत कुठलेही स्पष्टीकरण आले नसले तरी तो बेगुलसराय मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढवेल अशी सर्वांना आशा आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live