बॉलिवूड गायिका कनिका कपूर कोरोनामुक्त, आज मिळाला डिस्चार्ज

साम टीव्ही
सोमवार, 6 एप्रिल 2020

बॉलिवूड गायिका कनिका कपूरला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. बेबी डॉल फेम कनिकाला कोरोनाची लागण झाल्याने तिच्यावर लखनौतील संजय गांधी रुग्णालयात उपचार सुरू होते.

बॉलिवूड गायिका कनिका कपूरला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. बेबी डॉल फेम कनिकाला कोरोनाची लागण झाल्याने तिच्यावर लखनौतील संजय गांधी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान तिची सहावी टेस्ट निगेटिव्ह आल्याने आता तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्च देण्यात आलाय.

काही दिवसांपूर्वी कनिकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आल्याने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली. तसंच हॉस्पिटलमध्ये तिला इतर कोरोनाग्रस्तांपेक्षा जास्त सुविधा पुरविण्यात येत असल्याचा आरोपही केला जात होता.

१६ मार्च रोजी कनिकामध्ये करोना व्हायरसची लक्षणे दिसून येऊ लागली होती आणि २० मार्च रोजी तिचा पहिला करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

Singer Kanika Kapoor has been discharged from Sanjay Gandhi Postgraduate Institute of Medical Sciences (SGPGIMS), Lucknow after the report of her sixth test, came negative. (file pic) pic.twitter.com/LpWEuHyLls

— ANI UP (@ANINewsUP) April 6, 2020

कनिकाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यावर ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय होती. करोनाची लागण झाल्यानंतरही ती डिनर पार्टीला गेली होती. तिच्या संपर्कात आलेल्या जवळपास २५० ते ३०० लोकांचा नंतर शोध घेण्यात आला होता. सुदैवाने त्यापैकी कोणाला अद्याप करोनाची लागण झालेली नाही.

Web Title - marathi news kanika kapoor got discharge from hospital


संबंधित बातम्या

Saam TV Live