2019 मध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन झाले तर देश रविवारी सुटीवर जाईल : अमित शहा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 जानेवारी 2019

कानपुर- लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना, जर 2019 मध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन झाले तर देश रविवारी सुटीवर जाईल, असे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. कानपुरमध्ये एका सभेला शहा संबोधित करत होते.

शहा म्हणाले की, महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर सोमवारी मायावती, मंगळवारी अखिलेशजी, बुधवारी ममताजी, गुरुवारी शरद पवार, शुक्रवारी देवेगौडा आणि शनिवारी स्टॅलिन पंतप्रधान असतील, तर रविवारी देशच सुटीवर जाईल. 

सप आणि बसप ही आघाडी म्हणजे भ्रष्टाचार आणि अपराधाची आघाडी आहे. तसेच, भाजप आणि मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळेच मोदींच्या विरोधात ही आघाडी उभी करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. योगीजी आणि मोदीजी यांचीच जोडी उत्तरप्रदेशला विकासाचा रस्ता दाखवू शकते, असेही शहांनी सांगितले. उत्तर प्रेदेशात सध्या भाजपचे सरकार असल्याने इथले गुंड गळ्यात पट्टे घालून फिरत असल्याचेही शहा यांनी सांगितले.

Web Title: If a grand government was formed in 2019, then country will go on holiday on Sunday : Amit Shah

संबंधित बातम्या

Saam TV Live