डॉक्टरच्या एका इंजेक्शनमुळे ९० जणांना HIV ची लागण

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 मे 2019

कराची : पाकिस्तानमधील एका डॉक्टरने एचआयव्ही संसर्ग असलेल्या सुईने इंजेक्शन दिल्यामुळे 90 जणांना एचआयव्हीची बाधा झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री अझरा पेछुहो यांनी दिली.

संबंधित डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे डॉक्टर स्वत:ही एचआयव्ही बाधित असल्याची माहिती पुढे आली आहे. एचआयव्हीची बाधा झालेल्या 90 जणांमध्ये 65 मुलांचा समावेश आहे.

जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 'गेल्या आठवड्यात प्रशासनाला याबाबतची मिळाली होती. प्रथम लरकाना परिसरात 18 मुलांना एचआयव्हीची बाधा झाल्याचे पुढे आले. मात्र, अधिक तपासानंतर हा आकडा वाढतच गेला. एकूण 90 जणांमध्ये 65 मुलांचा समावेश आहे. एचआयव्हीची बाधा झालेल्या मुलांची वये दोन महिने ते 8 वर्षे दरम्यानची आहेत. डॉक्टरच्या चुकीमुळे या 90 जणांना शिक्षा भोगावी लागत आहे. त्यांच्या पालकांचीही तपासणी करण्यात आली, मात्र सुदैवाने त्यांना बाधा झालेली नाही. हे सर्व एकाच डॉक्टरने केले असून, त्याने एचआयव्ही बाधित सुईने इंजेक्शन दिल्याने हा प्रकार घडला आहे.'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आरोग्य विभागाच्या तक्रारीनंतर संबंधित डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी डॉक्टरही एचआयव्ही बाधित असल्याची माहिती तपासातदरम्यान पुढे आली. जागतिक आरोग्य संस्थेचे पथक परिसरात दाखल झाले आहे. एचआयव्हीची बाधा झालेल्या रुग्णांवर ते उपचार करत आहेत.'

दरम्यान, सध्या पाकिस्तानात एचआयव्ही पॉझिटिव्ह आणि एड्सचे रुग्ण तुलनेने कमी आहेत. अंमली पदार्थाचे सेवन करणारे, वेश्या व्यवसाय आणि परदेशातून परतलेल्या मजुरांमध्ये एड्सचे प्रमाण अधिक आहे.

Web Title: doctor arrested after 90 infected by HIV syringe at pakistan

संबंधित बातम्या

Saam TV Live