बेबो लढवणार मध्य प्रदेशातून निवडणूक ?

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 जानेवारी 2019

मुंबई : अभिनेत्री करिना कपूर मध्य प्रदेशातील राजकारणात आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे. 

मुंबई : अभिनेत्री करिना कपूर मध्य प्रदेशातील राजकारणात आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे. 

करिनाला भोपाळमधून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याची मागणी भोपाळ कॉंग्रेसने केली आहे. गेली 40 वर्षे कॉंग्रेस भोपाळमध्ये पराभूत होत आहे. करिना कपूर-खान भोपाळची निवडणूक जिंकू शकते. भोपाळ करिनाचे सासर आहे आणि करिना पती सैफ अली खानसोबत नेहमीच भोपाळमध्ये जात असते. त्यामुळे कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी करिनाला कॉंग्रेसचा उमेदवार म्हणून उभे करण्याची मागणी केली. कॉंग्रेस नेते गुड्डू चौहान, अमित शर्मा आणि मोनू सक्‍सेना यांनी कॉंग्रेसच्या वरिष्ठांपर्यंत ही गोष्ट पोचवली आहे.

भाजपनेही पुण्यातून माधुरी दीक्षित हिच्या नावाची चर्चा घडवून आणली होती. 

WebTitle : marathi news kareena kapoor may contest election from MP 


संबंधित बातम्या

Saam TV Live